अकलूजच्या बी बियाणे विक्रेत्यांकडून निकृष्ट दर्जाच्या बियाण्याच्या विक्रीमुळे शेतकरी हवालदिल नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा
अकलूज (प्रतिनिधी ): ‘हायटेक सोना’ या कंपनीचे ५१०१ मकेचे बी निकृष्ट दर्जाचे निघाल्याने सर्व उत्पन्न वाया गेले असून याबाबत संबंधित खत विक्रेता व कंपनी उडवाउडवीची उत्तरे देत असून नुकसान भरपाई न मिळाल्याने माझ्यासमोर आत्महत्ये शिवाय पर्याय उरला नसल्याची आर्त भावना शेतकरी बापूराव वाघ यांनी व्यक्त केली.मौजे लवंग ( तालुका माळशिरस ) येथील शेतकरी बापूराव ज्ञानोबा वाघ यांनी आझाद चौक अकलूज येथील सुनील गांधी यांच्या सुनील ट्रेडिंग कंपनी या बी बियाणे विक्री दुकानातून बुधवार (ता. 17 ऑगस्ट 22 ) रोजी मकेचे हायटेक सोना कंपनीचे 5101 हे बी पेरणीसाठी विकत घेतले. सदर मका पेरल्यानंतर चार ते पाच दिवसांनी संपूर्ण मका उगवणे अपेक्षित होते परंतु सलग चौदा दिवस झाले तरी त्याची 50 टक्के सुद्धा उगवण झाली नाही. त्यानंतर सुमारे 90 दिवस झाले तरी या पन्नास टक्के उगवणीतीलही त्याची उंची कमी असून कुठलीही फळधारणा झालेली नाही. वास्तविक बापूराव वाघ यांना केवळ एक एकर जमीन असून कुटुंबाचा उदरनिर्वाह या एक एकर जमिनीवरच अवलंबून आहे. बऱ्याचदा निसर्गाच्या अवकृपेमुळे त्या एकर जमिनीतील उत्पन्न नाहीसे होते व उपासमारीची वेळही त्यांच्यावर येत असते परंतु या वेळेस निसर्गाने साथ दिली असली तरी निकृष्ट बियाण्यामुळे पुन्हा उपासमारीची वेळ आणली आहे. अनेकदा निसर्गाच्या अवकृपेमुळे हातचे पीक गेल्याने कर्जबाजारी झालेल्या या शेतकऱ्यास पुन्हा कर्ज मागण्याची वेळ आली असून आता सतत कर्ज काढण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी माझ्या आत्महत्या बियाणे विक्रेता व कंपनी जबाबदार असून त्यांच्यावर माझ्या मरणानंतरतरी कारवाई व्हावी अशी अपेक्षा श्री वाघ यांनी व्यक्त केली अकलूज येथील बियाणे विक्रेत्याकडे गेल्यानंतर बियाणे घेणेपर्यंत ते या बियाण्यामुळे जास्त उत्पन्न येईल जास्त फायदा होईल अशा बड्या बड्या गोष्टी सांगतात परंतु प्रत्यक्ष तसे होताना काहीच दिसत नाही. संदीप बियाणे निघाल्यावर मात्र ते कंपनीकडे बोट दाखवून रिकामे होतात मगहि दुकाने फक्त नफा मिळवण्यासाठीच आहेत का ? शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानी ते जबाबदार नाहीत का? शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मागितल्यानंतर कोर्टात जावा असा प्रेमळ सल्ला देऊन देतात परंतु शेतकऱ्यांना ते परवडणारे आहे का ? ‘शेतकऱ्यांचे आम्हीच कैवारी आहोत’ असा आव आणणार्या शेतकरी संघटना अशा किरकोळ गोष्टीकडे लक्ष देतील काय ? असे अनेक प्रश्न श्री वाघ यांनी उपस्थित केले आहेत.
*चौकट :-
*कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याची क्रूर चेष्टा.*निकृष्ट दर्जाचे बी आहे हे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेते व त्यांच्या मार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्या अधिकाऱ्याने संबंधित प्लॉट पाहून नुकसान भरपाई पोटी त्या शेतकऱ्याने गेले दोन महिने घातलेले हेलपाट्याच्या खर्चापेक्षा कमी रक्कम सांगून क्रूर चेष्टाच केली. आणि कोर्टात जाण्याचा सल्ला देत तेथेही आम्ही आमची बाजू मांडून तुमच्याच चुका दाखवू तेथे जाऊनही तुम्हाला काहीच फायदा होणार नसल्याचे ठामपणे सांगितले त्यामुळे शेतकऱ्याला कोणी वाली आहे का ? असा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होत आहे.
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची बी बियाणे विक्रेते यांचेकडून फसवणूक झाली असल्यास निसंकोचपणे 7841847458या नंबर वर संपर्क साधावा.
क्रमशः भाग -1.







