*वेळापुरचा ऐतीहासीक वारसा पर्यटनदृष्ट्या प्रेरणादायी आहे-प्रा.सदाशिव देवकर*
संग्रामनगर दि.७ (केदार लोहकरे यांजकडून)अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापिठ सोलापूर संलग्नित, शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज इतिहास विभाग व राज्यशास्त्र विभाग यांचे संयुक्त विदयामाने आयोजित *एक दिवसीय वारसा वेळापुरचा इतिहास व मंदिर स्थापत्य अभ्यास दौरयामध्ये* मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे प्रेरणेतुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांचे नेतृत्वाखाली महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.त्याच अनुषंगाने आज इतिहास विभाग व राज्यशास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वेळापुरचा अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आलेले होते.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पुरातत्व शास्त्र विभाग सोलापूरचे प्रा.सदाशिव देवकर बोलत होते. वेळपुरचे नाव,मंदिराचा इतिहास,कालखंड,स्थापत्य शास्त्र,मंदिर रचना,वास्तुकला, शिल्पकला,हस्तलिखित,शिलालेख,मंदिर शैलीचे विविध प्रकार,परिसरातल्या दंतकथा व वेळापुर परीसरातील अनेक महत्वाच्या मंदिराची अभ़्यासपुर्ण माहिती प्रा.देवकर यांनी या अभ्यास दौ-यात दिली. अर्धनारी नटेश्वर मंदिर (उमा महेश्वर),खंडोबा मंदिर जानुबाई मंदिर,जैन मंदिर,कळवातीनीचा महाल,पुष्करणी,शिलालेख हा विविध विषयावर त्यांनी पुराव्यांचे अधारे मांडणी केली. माळशिरस तालुक्यातील वेळापुर,दहिगाव,अकलूज,तोंडले या गावांच्या इतिहासाचा अभ्यास होणे आवश्यक आहे त्यातुनच नवीन पर्यटनाला चालना मिळू शकते असेही मत त्यांना मांडले. या अभ्यास दौ-यामध्ये इतिहास परीषदेचे दिग्विजय जाधव,रविराज लव्हाळे,पत्रकार अशोक पवार,गुरुव गुरुजी,डॉ चंकेश्वर लोंढे,प्रा.हणमंत तेलसंग, प्रा.समाधान माने,प्रा बावळे, प्रा रवि नागटिळक,प्रा.अमोल खरात,पर्यटन व्यवयायीक वैभव आंबेकर यांचेसह महाविद्यालयातील 86 विदयार्थी सहभागी झालेले होते. एकदिवशीय अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी राहुल कोडग,सुरज ननवरे,रूत्वीक इंदलकर,सत्यजित चव्हाण,मारुती सुर्वे, नागन्नाथ साळवे,हितेश पुंज,प्रतिक फुले, कृष्णा जगताप,समाधान इंगळे, प्रकाश भोसले यांना विशेष प्रयत्न केले. एकदिवशीय अभ्यास दौ-याचे संपुर्ण नियोजन डॉ.विश्वनाथ आवड,डॉ संजय वाघमारे,प्रा.दत्तात्रय मगर,प्रा. सज्जन पवार यांनी केले.








