विष्णू नारायण क्रिकेट क्लब पिरळे यांचे वतीने अर्जुनसिंह मोहिते -पाटील चषक -2022भव्य फुलपीच गाववाईज टेनिसबॉल स्पर्धेचे 11नोव्हेंबर ते 15नोव्हेंबर या कालावधीत पिरळे येथे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )विष्णू नारायण क्रिकेट क्लब पिरळे यांचे वतीने अर्जुनसिंह मोहिते -पाटील चषक -2022भव्य फुलपीच गाववाईज टेनिसबॉल स्पर्धेचे 11नोव्हेंबर ते 15नोव्हेंबर या कालावधीत पिरळे येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक साठी युवा उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने 51,000रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांक व चषक 31,000, (संदीप तात्या नरोळे, सरपंच, ग्रा. पं. पिरळे.),व सुनील दादा माने (माळशिरस तालुका अध्यक्ष, शिवसेना.), तृतीय क्रमांक,15,000.सौ, सुशीला रघुनाथ वाघ (ग्रा. पं. सदस्य, पिरळे ), चतुर्थ क्रमांक,11,000, विजय जाधव, मेजर, व ज्ञानेश्वर कारंडे (सद्गुरू इलेक्ट्रिकल व इंजीअरिंग पुणे )यांचे वतीने बक्षीस देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी 3500रुपये प्रवेश फि असणार आहे.
सदर स्पर्धा ही गाववाईज खेळविली जाणार आहे. पंचांचे निर्णय अंतिम राहतील.सामने सहा षटकांचे राहतील.सामन्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार आयोजकाकडे राहतील.संघातील प्रत्येक खेळाडूंकडे आधारकार्ड बंधनकारक राहील.स्पर्धेत प्रथम 32संघांना प्राधान्य दिले जाईल.स्पर्धेत संघ वेळेत हजर न झाल्यास 5धावांची पेनल्टी दिली जाईल.चेंडू संयोजक यांचेकडून दिले जातील.प्रवेश फि 50%भरल्याशिवाय संघ ग्राह्य धरला जाणार नाही.सेमी फायनल साठी दोन आयकॉन बंधनकारक राहतील.
सदर स्पर्धेत मैदान सौजन्य पांडुरंग साळवे (मा. चेअरमन वि.से. सो. पिरळे ), यु ट्यूब लाईव्ह, टी शर्ट व चषक सौजन्य सतीश तात्या ढेकळे (युवा उद्योजक ),पाणी जार, संदीप वाघ (सर ), बॉल, स्टम्प दत्तात्रय गायकवाड यांचे सौजन्य असणार आहे.
सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी भाऊसाहेब भिसे, सचिन जाधव,दत्तात्रय शिंगाडे, गणेश माने,सुरेश शिंदे, सोमनाथ वाघ (9975410755),अजिनाथ होळकर (8007667850), राहुल माने (9665282850)या नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन संयोजक विष्णू नारायण क्रिकेट क्लब, पिरळे यांनी केले आहे.








