अकलूज चे ग्रामदैवत श्री अकलाईदेवी देवस्थान अकलूज येथे त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त 7 नोव्हेंबर रोजी दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज चे ग्रामदैवत श्री अकलाईदेवी देवस्थान अकलूज येथे त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त सोमवार 7 नोव्हेंबर रोजी सायं. 5-30 ते 7 या वेळेत श्री अकलाईदेवी मंदिर व मंदिर परिसरामध्ये दीपोत्सव आयोजीत केलेला आहे. तेव्हा भाविकांनी पणती, दिवे आणून या कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन श्री अकलाई देवी देवस्थान अकलूज चे कार्यकारी विश्वस्त जयसिंह(बाळदादा )शंकरराव मोहिते पाटील यांनी केले आहे.










