*ईडीची चौकशी टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आ.बबनदादा शिंदे?*
प्रतिनिधी/सोलापूर; कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात काल मुक्कामी आले होते.सोलापूर जिल्ह्य़ातील भाजपचे खासदार सर्व आमदार अगदी शिंदे गटाचे मंत्री सावंत यांनी देखील फडणवीस यांची भेट घेतली.पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे निष्ठावंत म्हणवले जाणारे व भाजपच्या वाटेवर असलेल्याची चर्चा असणारे माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी प्रशांत परीचारक यांच्या निवासस्थानी रात्री उशीरा फडणवीस यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात व प्रसिद्धी माध्यमात ED चा ससेमिरा टाळण्यासाठीच भेट घेतली? असल्याचे चर्चांना उधाण आले आहे.*शिंदे यांच्या मागे ED चौकशी लावणारे नागनाथ कदम यांनी देखील फडणवीस यांची घेतली भेट*आ.बबनदादा शिंदे यांच्या विरोधात ईडी चौकशीतले तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी देखील पंढरपूर विश्रामगृहात फडणवीस यांची भेट घेत कागदपत्रांची फाईल त्यांच्याकडे सुपूर्द केली. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणे. शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी यासह विविध विषयात ईडीकडून शिंदे यांची चौकशी झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम प्रसिद्ध माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले फडणवीस यांच्याकडे शिंदे यांच्या कडून ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.तसेच वेळप्रसंगी शिंदे यांच्या विरोधात कडक कारवाई होण्यासाठी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन करू असे कदम म्हणाले..उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या पंढरपूर दौऱ्यात शिंदे यांच्या विरोधात ईडी लावणारे नागनाथ कदम भेटून गेल्यानंतर लगोलगच आ.बबनदादा शिंदे यांनी रात्री उशीरा फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात व माध्यमात ईडी चौकशी टाळण्यासाठीच फडणवीस यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे.माढा तालुक्यात आ.बबनदादा शिंदे यांना टोकाचे विरोध असणारे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे आ.बबनदादा आपली काळेकारनामे लपवण्यासाठी मागे लागेलेली ED ची चौकशी चुकवण्यासाठी रात्रीच्या अंधारात लपून छपून फडणवीस यांची भेट घेतली. असे खोचक टोले मारत परीचारक यांच्या निवासस्थानी रात्री घेतलेल्या भेटीचे फोटो पुरावा म्हणून सोशल मिडीयावर टाकत आहेत.







