उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख साहेब यांचा5नोव्हेंबर रोजी कोडोली येथे भव्य नागरी सत्कार
कोडोली तालुका जिल्हा सातारा येथील सुपुत्र माननीय न्यायमूर्ती श्री संजय आनंदराव देशमुख यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली, म्हणून कोडोली कृतज्ञता मंच व ग्रामस्थ कोडोली पंचक्रोशी यांच्यातर्फे शनिवार दिनांक 5 /11 /2022 रोजी सायंकाळी 5 वाजता साई सम्राट मंगल कार्यालय, रहिमतपूर रोड जि प शाळेसमोर कोडोली, सातारा येथे भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे .सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री.संभाजी शिंदे साहेब निवृत्त मुख्य न्यायाधीश ,राजस्थान उच्च न्यायालय व अध्यक्ष स्थानी निवृत्त न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथा विद्यमान महाराष्ट्र राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेंद्र तावडे साहेब हे उपस्थित राहणार आहेत .सदर कार्यक्रम हा पंचक्रोशीतील मोठा भव्य नागरी सत्कार सोहळा आहे . कोडोली गावचे सुपुत्र माननीय संजय आनंदराव देशमुख हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व सैनिकी परंपरा असणाऱ्या कुटुंबातील आहेत .त्यांचे कोडोली गावात प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक शिक्षण भवानी विद्यामंदिर सातारा येथे झाले व लॉ चे शिक्षण इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज , सातारा येथे झाले. त्यानंतर त्यांनी एल एल एम चे शिक्षण हे पुणे येथून पूर्ण केले .देशमुख यांनी अनेक सामाजिक कार्यात प्रचंड योगदान दिले आहे. मूळचा सामाजिक पिंड असणारे देशमुख साहेब यांनी न्यायाधीश परीक्षांसाठी मार्गदर्शन, वकिलांसाठी मार्गदर्शन , आरोग्य व बुद्धी संवर्धन व्याख्याने ,व्यक्तिमत्व विकास व्याख्याने ते देत आले आहेत ज्या ज्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम केले तेथे वकिलांसाठी मार्गदर्शन वर्ग त्यांनी चालवले आहेत. असे माननीय संजय देशमुख साहेब यांचे व्यक्तिमत्व आहे .सातारा जिल्हा न्यायालयात पंधरा वर्षे एक निष्णांत वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला व सन 2008 मध्ये ते डायरेक्ट जिल्हा न्यायाधीश परीक्षा पास झाले .त्यानंतर यशस्वी न्यायाधीश म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी काम केले . मुंबई येथे त्यांनी मोक्का व पोटा विशेष न्यायाधीश म्हणून काम केले आहे.महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ कायदेविषयक सल्लागार व विधी सचिव म्हणून त्यांनी काम केले. तसेच मराठा आरक्षण पुनर्विलोकन समितीमध्ये त्यांनी काम केले. आहे .त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती केली आहे. अभ्यासू वृत्ती चिकाटी दुसऱ्यासाठी सदैव चांगले काहीतरी करण्याची वृत्ती प्रामाणिकपणा यामुळे सदर यश मिळवले आहे.सदर यश सातारा जिल्ह्याला अभिमानास्पद असे आहे. या यशाबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी बहुसंख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे ,असे आव्हान मंच व ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 94 22 03 80 83 ,98 22 0 63 99 ,89 99 97 82 38 यावर संपर्क करावा









