*गोविंदबागेत पार पडला पवार कुटुंबीयांचा खास पाडवा*
बारामती : दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय कार्यकर्त्यांची आवर्जून भेट घेतात. गोविंदबाग म्हणजे शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी आजचा दिवस अत्यंत खास असतो. यानिमित्त सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार हे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतात त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करतात. त्यामुळे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची या ठिकाणी गर्दी असते. यावेळी आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘सकाळी सहा वाजल्यापासून लोक येथे आले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह पहायला मिळतोय. यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ मिळत. लोक ही आपली ताकद असतात.’ अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिली.याठिकाणी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून त्यांच्यासाठी दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आलं होत. सकाळी आठ पासून सुरु झालेला हा कार्यक्रम दुपारी बारापर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.







