*माणुसकीमुळे उजळली वंचितांची दिवाळी *सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतिने वंचित गोर गरीब दिव्यांग लोकांना नविन कपडे ड्रेस दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले*
सर्वत्र दिवाळी सण साजरा होत असताना समाजातील निराधार गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात या वंचित घटकातल्या व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा त्यांचेही दिवाळी गोड व्हावी यासाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतिने कपडे दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले मोल मजुरी करणाऱ्या व दिव्यांग व्यक्तीच्याही घरात दिवाळी साजरी झाली पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे या हेतूने सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाने हा उपक्रम राबवला आहे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष राजेजी कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजसजी परमार पश्चिम भारतात अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने व महिला प्रदेशाध्यक्ष सुनीताताई बापूसाहेब पाटील महेशजी भास्करे यांच्या मार्गदर्शनाखालील हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला यावेळी उपस्थित। पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने महेशजी भास्करे पांचाळ सोनार सामाज महामंडळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकलूज शहर उपाध्यक्ष अभिषेक चाबुकस्वार संग्राम नगर विभाग अध्यक्ष रोहित टेके होते














