*अकलूजच्या कृषी ऊत्पन्न बाजार समितीमध्ये डाळींबाला उच्चांकी दर*
संग्रामनगर दि.२४ (केदार लोहकरे यांजकडून)अकलूजच्या शंकरराव मोहिते कृषी उत्पन्न बाजार समितीत आज डाळींबाला उच्चांकी दर मिळाल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अकलुज येथील मार्केट कमिटीकडे विक्रिस येणा-या भगवा जातीच्या डाळींबास प्रती किलो१५१/_रूपये ऐवढा विक्रमी दर गणेश फ्रुट कंपनीचे बाबासो सोनवणे यांचेकडे मिळाला असुन ऐन दिवाळीत शेतकरी वर्गाचे चेहर्यावरआंनद दिसत आहे.त्याबद्दल अक्षय व अतुल सोनवणे यांनी समाधान व्यक्त केले मार्केट कमिटीचे योग्य नियोजन,सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन,सचिव राजेंद्र काकडे यांचे कार्य कुशल नियोजन व शेतक-यांची जिद्द यामुळे भविष्यात तालुक्यातील डाळींब पिकाला चांगले दिवस येतील आवक वाढुन विक्रमी दर मिळण्यास मदत होईल असे मत डाळींब व्यापारी खंडू नानासो जाधव,राजुभाई बागवान,भोसले सरपंच व इतरांनी व्यक्त केले.








