मोहिते पाटील परिवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे अकलूज मध्ये होणार अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक धनगर समाजाने मानले मोहिते पाटील परिवाराचे आभार.
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज मध्ये धनगर समाजाचे श्रध्दास्थान राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध होत नव्हती.परंतु महाराष्ट्र राज्याचे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नमुळे अकलूज नगरीत शंभू महादेवाच्या मंदिराजवळ जागा मिळाली आहे व त्या जागेवर स्मारकाचे भूमिपूजन दिनांक 26/10/2022 रोजी होणार आहे. दरम्यान मोहिते पाटील यांनी दिलेल्या शब्दांची पूर्तता केली. धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज परिसर यांना दिवाळी भेट म्हणून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास जागा उपलब्ध करून दिली.त्याबद्दल धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज परिसर तर्फे मोहिते पाटील परिवाराचे आभार मानन्यात आले आहेत.समाजातर्फे फटाक्यांची आतिषबाजी व जयघोष करत या निर्णयाचे स्वागत केले गेले,समाजा मध्ये मोहिते पाटील परिवाराने दिवाळीच्या मुहूर्तावर दिलेल्या निर्णयामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज,परिसर.चे अध्यक्ष लक्ष्मीकांत दगडू वाघे,यांनी समाजाच्या वतीने मोहिते पाटील कुटूंबाचे आभार मानले आहेत.









