*जयपूर राजस्थान येथे शॉटगन डब्बल ट्रॅप स्पर्धेत अॅड प्रकाश रा इंगळे यांना सिल्वर मेडल*
संग्रामनगर दि.१९ (केदार लोहकरे यांजकडून)जयपूर राजस्थान येथे ऑल इंडिया जी.व्ही.मालवणकर यांचे वतीने सिनियर मास्टर यांची डब्बल ट्रॅप शॉटगन स्पर्धा 7 ऑक्टोम्बर ते 14 ओक्टोम्बर रोजी घेण्यात आली होती त्यामध्ये अॅड.प्रकाश रामराव इंगळे यांना सिल्वर मेडल मिळाले त्याबद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने न्यायसंकुल येथील ग्रंथालयामध्ये अभिनंदन व सत्कार करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयपूर येथील सदर स्पर्धेत भारतातून एकूण 450 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कोल्हापूर येथील अॅड.प्रकाश इंगळे यांनी सिल्वर मेडल मिळवले या बद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सिनियर सभासद या नात्याने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला.तसेच यावेळी अॅड.पृथ्वीराज इंगळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या डब्बल ट्रॅप नॅशनल नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव निवड झाले बद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला.यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा उपाध्यक्ष अॅड.विवेक घाटगे, उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण,सेक्रेटरी अॅड.विजयकुमार ताटे- देशमुख, माजी अध्यक्ष अॅड.शिवाजीराव राणे,अॅड.अशोक पाटील,अॅड.संपतराव पवार,अॅड.पिटर बार्देस्कर,अॅड.किरण महाजन,अॅड.शिवराम जोशी,अॅड.चेचर,अॅड.कोमल राणे,अॅड.रमेश हिलाल,अॅड.किशोर पाटील,अॅड.अजित हुक्केरी तसेच सर्व सन्मानीय वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.







