*संग्राम नगर साई नंबर 1 2 3 मध्ये उसळली अस्वच्छतेची लाट….मैत्री प्रतिष्ठान ने दिला बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा**
मौजे संग्रामनगर,ता.माळशिरस जि.सोलापूर या ठिकाणी साईनगर एक दोन तीन मध्ये अस्वच्छतेची लाट उसळलेली आहे.या ठिकाणी अनेक गटारी तुंबलेल्या आहेत.अनेक ठिकाणी कचरा पडलेला व या कारणाने मोठ्या प्रमाणात डासाचे प्रमाण वाढले आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे नागरिकांची तक्रार येता मा.महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून संग्रामनगर ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर तेथे स्वच्छता करण्यात यावी अन्यथा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सहसचिव अक्षय गायकवाड यांनी दिला आहे.यावेळी मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सहसचिव अक्षय गायकवाड,मैत्री प्रतिष्ठानचे कार्यकारणी सदस्य श्रीकांत धनवडे, ता. उपाध्यक्ष शंकर मस्के आदी उपस्थित होते.*









