अकलूज -(प्रतिनिधी ) कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने समाजातील गरजू लोकांना दिवाळी चा सण साजरा करता यावा,या साठी योग्य व किफायतशीर दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. गतवर्षी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा माननीय कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते -पाटील यांनी स्वीकारल्यानंतर “रत्नाई मिठाई ” या नावाने हा समाजोपयोगी उपक्रमाला सुरुवात झाली.दर वर्षि हा उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रताप क्रीडा मंडळाने विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. रत्नाई मिठाई वाटप केंद्र, मारुती मंदिराजवळ ,शंकरनगर येथे असणार आहे. दि. 19ते 21 ऑक्टोबर 2022 या काळात सकाळी 10:00 ते रात्री 8:00 या वेळेत सुरू राहणार आहे.सदरच्या केंद्रात चिवडा लाडू ,बालुशाही, शंकरपाळी,व शेव इत्यादी फराळाचे पदार्थ किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहेत.हे पदार्थ स्वच्छ व उच्च दर्जाच्या साहित्य पासून बनवलेले आहेत. या केंद्रात चिवडा १ किलो- रु .२३०/-, लाडू १ किलो-रु.२४०/-, बालूशाही १किलो-रु.२४०/-, शंकरपाळी- १ किलो -रु.२३५/-, शेव -१किलो-२३०/-,असे यांचे दर आहेत.ना नफा ना तोटा या तत्वावर मंडळाने हा समाज उपयोगी उपक्रम सुरू केला आहे.या साठी नामदेव कुंभार-9511808004, जयंतराव माने देशमुख-7720067824, शिवाजीराव पारसे-8329590065, बाळासाहेब सावंत-9960195839 यांच्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन मंडळाचे सचिव मा. श्री. पोपटराव भोसले पाटील यांनी केले आहे.तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा व दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, खजिनदार वसंतराव जाधव, संचालक यशवंतराव माने देशमुख, राजेंद्र देवकर, बिभिषन जाधव, संग्राम रणनवरे , फिरोज तांबोळी, सुहास थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.







