• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

ना नफा ना तोटा ” तत्वावरील रत्नाई मिठाई केंद्र हा उपक्रम समाजाला फायदेशीर—मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 19, 2022
in आपला जिल्हा
0
ना नफा ना तोटा ” तत्वावरील रत्नाई मिठाई केंद्र हा उपक्रम समाजाला फायदेशीर—मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील
0
SHARES
382
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

” ना नफा ना तोटा ” तत्वावरील रत्नाई मिठाई केंद्र हा उपक्रम समाजाला फायदेशीर—मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील

अकलूज (प्रतिनीधी) कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळाने ” ना नफा, ना तोटा ” या तत्त्वावर व उत्कृष्ट गुणवत्तेसह ” रत्नाई मिठाई केंद्र ” हा सामाजिक जबाबदारी घेऊन सुरू केलेला उपक्रम आहे. याचा समाजाला निश्चितच फायदा होईल असे मत प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. शंकरनगर येथे प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने खास दीपावली निमित्त ” ना नफा, ना तोटा” या तत्त्वावर व उत्कृष्ट गुणवत्ते सह रत्नाई मिठाई वाटप स्टॉल केंद्राचे उद्घाटन मा. श्री जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रताप क्रीडा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा मा. कु स्वरूपा राणी मोहिते पाटील, अकलूज विविध कार्यकारी सोसायटीचे मा.श्री. लक्ष्मणराव आसबे, मंडळाचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सचिव पोपटराव भोसले पाटील, खजिनदार वसंतराव जाधव, संचालक यशवंतराव माने देशमुख, संग्राम रणनवरे, बिभिशन जाधव, राजेंद्र देवकर, आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना मा. श्री जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, समाजातील सर्वसामान्यांना आपली दिवाळी साजरी करता यावी यासाठी पूर्वी प्रताप क्रीडा मंडळ इंदिरा मिठाई केंद्र म्हणून सदरचा उपक्रम राबवत होती. आता पुन्हा ” ना नफा ना तोटा ” या तत्त्वावर रत्नाई मिठाई केंद्र हे सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे.५०-६० वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी समाजात एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे घरात प्रत्येक महिला फराळ मिठाई बनवत होत्या. परंतु सध्या यामध्ये बदल झाला. हम दो हमारे दो, या संस्कृतीमुळे एकट्या महिलांनाच सर्व पदार्थ करावे लागतात. त्यामुळे हा उपक्रम व यातील पदार्थांची उत्कृष्ट गुणवत्ता असल्याने या उपक्रमाचा फायदा महिलांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. प्रस्ताविकात उपाध्यक्ष प्रताप पाटील म्हणाले,मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील यांनी सुरू केलेला प्रताप क्रीडा मंडळाचा लौकिक व वारसा पुढे सुरू ठेवण्याचे कार्य विद्यमान अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी सुरू ठेवले आहे. सदरच्या मिठाई केंद्रात मागील वर्षी ३७५० किलो पदार्थांची ची विक्री झाली होती. तर यावर्षी आत्तापर्यंत ३२०० किलो पर्यंतची नोंदणी मंडळाकडे झाली आहे. यामध्ये लाडू, शेव, चिवडा, बालुशाही, व शंकरपाळी या पाच पदार्थांचा समावेश आहे. प्रारंभी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व स्वर्गीय श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. तर मिठाई नोंदणी केलेल्यांना या.श्री. जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते मिठाई किटचे प्राथमिक स्वरूपात वाटपही करण्यात आले .मिठाई तयार करणारे मदन महाराज यांचा सत्कार या.श्री. जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. रत्नाई मिठाई स्टॉल हा दिनांक १९ ते २१ ऑक्टोबर २०२२ सायंकाळ पर्यंत सुरू राहणार असून याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहनही सचिव पोपटराव भोसले पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आर आर पाटील यांनी केले .तर आभार खजिनदार वसंतराव जाधव यांनी मानले. चौकट…. प्रताप क्रीडा मंडळाने आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही सन १९८२,१९८४, व १९८५ या काळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्त राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचे यशस्वी आयोजन केले होते. त्याच पद्धतीने पुढील वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करावे. आत्ताची तरुण पिढी ही मोबाईल, आणि टीव्ही मध्ये व्यस्त असल्याचे चित्र आहे .या विद्यार्थ्यांना मैदानाची आवड निर्माण व्हावी, त्यांना वेगवेगळ्या खेळाची माहिती मिळावी यासाठी प्रताप क्रीडा मंडळाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करावे असे मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची निमगावकरांना दिवाळी भेट.                      निमगांव पाणी पुरवठा योजनेकरिता 33 कोटी रूपयांच्या तांत्रिक आराखड्यास मंजूरी

.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची निमगावकरांना दिवाळी भेट. निमगांव पाणी पुरवठा योजनेकरिता 33 कोटी रूपयांच्या तांत्रिक आराखड्यास मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In