*कोल्हापूरचे नूतन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के.बी.अग्रवाल यांचा जाहीर सत्कार*
संग्रामनगर दि.१८ (केदार लोहकरे यांजकडून)कोल्हापूर जिल्हा न्यायालय येथील प्रमुख न्यायाधीश एस.सी.चांडक यांची पुणे येथे बद्दली झालेने नवीन पदभार स्वीकारलेने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशसो,मा.श्रीमती के.बी.अग्रवाल मॅडम यांचा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन वतीने सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. न्यायमुर्ती श्रीमती के.बी.अग्रवाल यांचा शाल,श्रीफळ,कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करणेत आला.यावेळी मा.श्रीमती एम.एस.काकडे मॅडम यांची दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर या पदावरून तदर्थ 2 जिल्हा व सत्र न्यायाधीशसो पदी पदोन्नती झाले बद्दल बार असो वतीने सत्कार करणेत आला.तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पदी न्यायाधीश श्रीमती व्ही.पी.गायकवाड यांची नियुक्ती व मुख्य न्यायदंडाधिकारी कोल्हापूर या पदावर न्यायाधीश श्री.एस.ए.बाफना यांची नियुक्ती झाले बद्दल त्यांचा देखील सत्कार करणेत आला.सदर कार्यक्रम वेळी प्रमुख सत्कारमूर्ती यांचे हस्ते सण 2023 वकील लॉ डायरीचे अनावरण करणेत आले. यावेळी बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष अॅड विवेक घाटगे यांनी असे प्रतिपादन केले की बार आणि बेंच मध्ये समन्वय साधून जलद न्यायदानाचे काम करू.जिल्हा न्यायालय कोल्हापूर येथे सिनियर डिव्हिजन न्यायाधीश व जिल्हा न्यायधीशांची संख्या वाढणे आवश्यक आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके म्हणाले,कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन सक्षम वकिलांचा बार आहे.पक्षकारांना जलद न्याय देणेकरिता समन्वयाने प्रयत्न करू. यावेळी प्रमुख सत्कारमूर्ती मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीशसो श्रीमती के.बी.अग्रवाल यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की कोल्हापूर जिल्ह्यात न्यायादानाची पार्श्वभूमी आहे.कोल्हापूर येथील शाहू महाराजांच्या नगरीत न्यायदानाचे काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजते,बार आणि बेंच समन्वयाने पक्षकारास जलद न्याय मिळणेकरिता सर्वतोपरी प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या. सदर कार्यक्रमास जिल्हा न्यायधीश क्र १ श्रीमती.पी.एफ सय्यदसो,कोल्हापूर जिल्हा बार असो.उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण,सेक्रेटरी अॅड.विजयकुमार ताटे- देशमुख जॉईंट सेक्रेटरी अॅड.संदीप चौगुले अॅड.तृप्ती नलवडे,अॅड.संकेत सावर्डेकर,माजी अध्यक्ष अॅड.प्रकाश मोरे,अॅड.शिवाजीराव राणे,अॅड.अशोक पाटील,अॅड.अजित मोहिते,तसेच सर्व सन्मानीय न्यायधीशवर्ग व सन्मानीय वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख यांनी केली तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण यांनी केले.







