वारसा परिवार अकलूज, यांच्यावतीने अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व अकलूज पोलीस ठाणे यांना देवता व राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले आणि चिनी फटाके यांच्या अवैध विक्रेत्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन
अकलूज (प्रतिनिधी )वारसा परिवार अकलूज, यांच्यावतीने 17ऑक्टोबर रोजी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद.दा.गोरे यांना देवता व राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले आणि चिनी फटाके यांच्या अवैध विक्रेत्यावर कारवाई करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले.निवेदन देताना रणजीतदादा गायकवाड, शिवाजी घोडके,रोहित सूर्यवंशी,तेजस माने-देशमुख,राजेश पलंगे, भरत भानुशाली.इत्यादी उपस्थित होते.त्याचप्रमाणे वारसा परिवार अकलूज यांच्यावतीने अकलूज पोलीस स्टेशन अकलूज या ठिकाणी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना देवता व राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले आणि चिनी फटाके यांच्या अवैध विक्रेत्यावर कारवाई करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले.निवेदन देताना रणजीतदादा गायकवाड, गणेश इंगळे,शिवाजी घोडके,रोहित सूर्यवंशी, रोहित खाडे,तेजस माने-देशमुख,आकाश वाईकर,सागर म्हेत्रे,सुरज सूर्यवंशी.इत्यादी उपस्थित होते.








