*जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीत 889 ग्रामपंचायतींवर भाजप-शिंदे गटाने विजय मिळाला असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून आम्हांला मतदान केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.मुरजी पटेल निवडून येणार ही आमहाला खात्री होती, काही लोकांनी समोरून आणि मागून विनंती केल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर आम्ही अंधेरी पूर्व निवडणुकीतून माघार घेतली असल्याचं ते यावेळी म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच कारशेडसंदर्भात आम्ही लवकरच निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान, आम्ही महाराष्ट्राची परंपरा कायम राखली असून आर. आर. पाटील यांच्या निधनानंतरही त्यांच्या मतदारसंघात आम्ही उमेदवार दिला नसल्याचं ते म्हणाले आहेत.https://letsup.app.link/eaN8h7Z







