*अंधेरीत भाजपची माघार, अजित पवारांकडून कौतुक अन् अभिनंदन*
मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने माघार घेतली. यानंतर राज ठाकरे आणि आता अजित पवारांनी भाजपचं निर्णयाचं अभिनंदन करत कौतुक केलं.अजित पवार म्हणाले, अंधेरी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार आणि राज ठाकरे यांनी आवाहन केलं होतं. यानंतर भाजपने माघार घेतल्याने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हा एक चांगल्या परंपरेचा पायंडा पाडला गेला आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी भाजपच्या निर्णयाचं स्वागतं केलं.मात्र सगळीकडे असंच झालेलं नाही. प्रत्येकवेळेस अशा प्रकारची माघार घेतली जात नाही. याआधी कोल्हापूरची निवडणूक झाली. नांदेड, पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक झाल्याची आठवण पवारांनी सांगितली. पवार म्हणाले, ठाकरे गटाकडून ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिली होती. यावेळेसचं वातावरण लक्षात घेता, दिवाळी तोंडावर आहे. तरीही या धावपळींच्या काळामध्ये लटके कामाला लागल्या होत्या, घरोघरी फिरत होत्या. सगळ्यांच्या आवाहनानंतर भाजपने माघार घेत चांगला निर्णय घेतला







