*गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न*
अकोले खुर्द. ता. माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय ऑनलाइन पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. डी. फार्मसी आणि बी. फार्मसी अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. डी. फार्मसी साठी ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच बी. फार्मसीसाठी ८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धेसाठी डी. फार्मसी व बी. फार्मसी साठी फार्मासिस्ट युनायटेड इन एक्शन फॉर अ हेलथिएर वर्ल्ड हे विषय होते.स्पर्धेत एकूण १५४ विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने सहभागी होते. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत बी. फार्मसी मधून प्रथम क्रमांक अदिती पवार व रोहन सिरसीला, दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर तसेच द्वितीय क्रमांक दुर्गेश चौधरी, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडी यांनी मिळवला. तसेच डी. फार्मसी मधून प्रथम क्रमांक श्रेयस साळे, जिजामाता कॉलेज ऑफ फार्मसी, सराटी व रोहन शिंदे, कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी, कराड यांना विभागून मिळाला तसेच द्वितीय क्रमांक मोहिनी पाटील व तेजस्विनी मिस्किन, गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, टेंभुर्णी यांना मिळाला. या स्पर्धेसाठी प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, अध्यक्ष अॕड विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे यांनी अभिनंदन केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. सुकुमार लांडे, प्रा. शिवराज ढगे, प्रा. केतकी पाटील यांनी काम केले.







