केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ए.एन.एम व जी.एन.एम या नर्सिंग अभ्यासक्रमांचा महाडीबीटी प्रणालीवर समावेश करावा
महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धैर्यशिल मोहिते-पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी/अकलूज;
राज्याचे महसूल तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीपूर येथील कार्यक्रमानिमित्त आले असता अकलूज येथे मोहिते-पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता या आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी ए.एन.एम. व जी.एन.एम या नर्सिंग अभ्यासक्रमांचा महाडीबीटी प्रणालीवर समावेश करावा म्हणून महसूल मंत्री विखे पाटील यांच्याकडे विनंती केली.
,दि ०१/०७/२०११ च्या केंद्र सरकारच्या पत्रान्वये परिशिष्ट (ब) मध्ये नमूद नर्सिंग पदविका अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे. पण अद्याप राज्य शासनाने ए.एन.एम व जी.एन.एम या पदविका अभ्यासक्रमांना महाडीबीटी प्रणालीवर समावेश करण्यासाठी मान्यता दिली नाही. त्यामुळे वि.जा.भ.ज.इ.मा.व. व वि.मा.प्र. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार शिष्यवृत्ती च्या योजनेचा लाभ घेता येत नाही व त्यामुळे नर्सिंग अभ्यासक्रमापासून या प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहत आहेत महाराष्ट्रातील या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थांना देखील केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्य शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी मोहिते-पाटील यांनी केली असता मंत्री विखे पाटील यांनी इतर कोणत्या कोणत्या राज्यात अशा प्रकारची शिष्यवृत्ती दिली जाते याची माहिती सादर करा त्याप्रमाणे आपण आपल्या राज्यात ही शिष्यवृत्ती लागू करण्यासाठी योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले.
ए.एन.एम व जी.एन.एम अभ्यासक्रम हा व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याचे दि.३०/१०/२०१८ च्या वैद्यकीय शिक्षण विभाग यांनअधिसुचना प्रसिद्ध करून जाहीर केले आहे. राज्य शासनाने भारत सरकार शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जाती व जमाती(SC व ST) या प्रवर्गास लागू करण्यात आली आहे. त्याप्रमाणे वि.जा.भ.ज.इ.मा.व. व वि.मा.प्र. या प्रवर्गास ही लागू करावे. तसेच दि.०७/०४/२०१५ रोजी च्या लक्षवेधी सूचना मधील दिलेल्या आश्वासनाचीही पूर्तता करण्यात आलेली नसून विधानसभेत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्वरित निर्णय घेण्यात यावा जेणेकरून सन २०२०-२१ मध्ये नर्सिंग ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी या नर्सिंग पदविका अभ्यासक्रमांचा दि.०४/०६/२०१९ च्या शासन निर्णयामध्ये मान्यता देऊन यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी विनंती केली.








