*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक हात धुवा दिन व वाचन प्रेरणा दिन साजरा*
अकलूज (प्रतिनिधी ) 15 ऑक्टोबर रोजी शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये ‘जागतिक हात धुवा दिन’ त्याचप्रमाणे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. कोरोना काळातील स्वच्छतेचे महत्व आणि कोरोना संसर्ग रोखण्यात हातांच्या स्वच्छतेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शालास्तरावर विद्यार्थ्यांमध्ये साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय रुजावी या उपक्रमाच्या अनुषंगाने स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रशालेमध्ये हात स्वच्छ धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक अभिषेक काटकर सर यांनी करून दाखवले व नंतर सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले ,तसेच चांगल्या सवयी आरोग्य शिस्त आणि आहार याविषयी तमन्ना नाईकवाडी आणि शिल्पा जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पुस्तक वाचनासाठी देण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जितेंद्र माने देशमुख सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








