*सब ज्युनिअर बास्केटबॉल जिल्हा संघ निवड चाचणी
*अकलूज: महा बास्केटबॉल असोसिएशन तर्फे दिनांक 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान 13 वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा अमॅच्युअर बास्केटबॉल असोसिएशन तर्फे दि.20 व 21 ऑक्टोबर 2022 रोजी सेलिब्रेशन मैदान ,सोलापूर येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे ज्या खेळाडूंची जन्मतारीख 1जानेवारी 2009 किंवा त्यानंतर असेल त्यांनी मूळ जन्म दाखला व आधार कार्ड सह दि.20 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी संघटना सदस्य श्री. अनिल देशपांडे सर (९४२१५८८९४३) व श्री. अनिल जाधवसर (९४२१०२४३६१) यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री धैर्यशील मोहिते पाटील व सचिव श्री एम .शफी यांनी आवाहन केले आहे.








