शेतकऱ्यांचा पांडुरंग माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर येथे होणाऱ्या २१ व्या ऊस परिषद निमंत्रण देण्यासाठी माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने झंझावाती गावोगावी दौरा करून बहुसंख्य शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन- आंदोलनकर्ते अजित कोडग
शेतकरी चळवळीवर प्रेम करणाऱ्या मान्यवरांनी लावली हजेरी
श्रीपूर/प्रतिनिधी : दि.१३/१०/२०२२स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी दि.15 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 1:00 वाजता विक्रमसिंह क्रीडांगण जयसिंगपूर येथे आयोजित केली आहे तरी या ऊस परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी माळशिरस तालुक्यातील सर्वच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी जनजागृती करन्याचे काम केले आहेस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव अण्णा फुले यांनी शेतकरी चळवळ टिकली पाहिजे यावर मार्गदर्शन केले, स्वाभिमानी विद्यार्थी आघाडी प्रमुख शिवराम गायकवाड यांनी “जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पोरांनी संघर्ष करायला शिकलं पाहिजे” या विषयावर चर्चा केली,सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गायकवाड यांनी “सध्याचे राजकारण,शेतकऱ्यांचे होणारी पिळवणूक, आर्थिक लूट” यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले, खळवे गावचेयुवानेते दीपक पाटील यांनी “शेतकरी ऊस लागवड ते ऊस गाळपासाठी पाठवेपर्यंत अर्थकारणाचे गणित,आरोग्य शिक्षण,मूलभूत गरजा” यावर मार्गदर्शन केले, वंचितचे नेते गोपाळ घार्गे देशमुख यांनी “दुधातील भेसळ,दूध दर वाढ व नुकसान,दूध केंद्र यांचेकडून केले जाणारे शोषण ” यावर चर्चा केली,आंदोलनकर्ते आजित कोडग यांनी “ऊस दर आंदोलनाची दिशा,कारखानदारी व वजन काटा आणि होणारी काटेमारी,शासकीय यंत्रनात होणारा भ्रष्टाचार यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलेस्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी माळशिरस तालुकाध्यक्ष अजित कोडग यांनी एकविसाव्या ऊस परिषदेसाठी बहुसंख्य शेतकरी बांधवांनी विक्रमसिंह क्रीडांगण जयसिंगपूर येथे आयोजित केलेल्या ऊस मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलनकर्ते अजित कोडग केले आहे माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळ टिकली पाहिजे, वाढली पाहिजे या विचाराने तन,मन, धनाने चळवळ खंबीरपणे उभी करणारे जेष्ठ मार्गदर्शक स्वाभिमानी पक्ष जिल्हा उपाध्यक्ष भिमराव(अण्णा) फुले,माजी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमरसिंह माने – देशमुख, युवा आघाडी माळशिरस तालुकाध्यक्ष अजित कोडग,विद्यार्थी आघाडी प्रमुख शिवराम गायकवाड, नेवरे गावचे सिराज तांबोळी, जनहित विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाबा गायकवाड,खळवे गावचे अर्थकारणाचे गाढे अभ्यासक दीपक पाटील,वंचित बहुजन आघाडी नेते गोपाळ काका घार्गे-देशमुख, कृष्णा पवार संतोष चव्हाण दीपक सावंत, दसुर गावचे युवा शेतकरी काकासाहेब कागदे आदी पदाधिकारी व तोंडले, बोंडले,दसुर,खळवे या गावातील शेतकरी चळवळीवर प्रेम करणारे अनेक तरुण शेतकरी,हितचिंतक,कार्यकर्ते उपस्थित होते









