सर्वसामान्य साठी महत्त्वाचा असलेल्या शिधापत्रिकेचा प्रश्न सोडवणे आवश्यक—– शितलदेवी मोहिते पाटील -सर्वसामान्य साठी महत्त्वाचा असलेला “शिधापत्रिके”चा प्रश्न संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोडवणे आवश्यक असून आपल्या भागात इतर मूलभूत गरजेची चंचल नाही मात्र शिजापत्रिकेबाबत नागरिकांची होत असलेली त्रिधा तिरपट तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्या व डॉटर मॉम्स फाउंडेशनच्या अध्यक्षा- शितल देवी मोहिते पाटील यांनी शिवरत्न फाउंडेशन –डॉटर्स मॉम्स फाउंडेशन व तहसील कार्यालय माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज मधील व्यंकट नगर येथे आयोजित विविध शासकीय योजना मार्गदर्शन व लाभ शिबिर प्रसंगी बोलताना व्यक्त केले याप्रसंगी 700 नागरिकांना विविध योजनांचा लाभ प्राप्त झाला असून याप्रसंगी तातडीने 50 नागरिकांना शिधापत्रिकेचे वाटप- शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
प्रारंभी या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले .याप्रसंगी माळशिरसचे पुरवठा अधिकारी- चंद्रशेखर लोखंडे, मंडळाधिकारी -चंद्रकांत भोसले, तलाठी शिंदे ,भाजपचे माळशिरस तालुका कोषाध्यक्ष सतीश व्होरा विलास क्षीरसागर, ग्रा. माजी सदस्या – नाजुका मोरे, विशाल फुले आदी मान्यवर उपस्थित होते हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत माजी सदस्य विशाल मोरे ,सद्दाम मकानदार, आसिफ तांबोळी, सलीम बागवान ,नुरद्दीन तांबोळी, सागर काटे, सागर बनसोडे, सनी वर्धम , नंदकुमार जाधव ,आदींनी परिश्रम घेतले









