मंगळवेढा /प्रतिनिधी: भैय्या खिलारे मंगळवेढा तालुक्यातील सर्व नागरिकांना कळववण्यात येते की मोबाईल सिम कार्ड 5G सेवा सुरु झाली आहे, ही गोष्ट तुम्हाला आधीच माहित आहे, सायबर गुन्ह्यातील काही बदमाश तुमच्या मोबाईलवर कॉल करतील आणि तुम्हाला तुमचे सिम कार्ड 4G वरून 5G वर अपडेट करण्यास सांगतील आणि तुम्हाला एक OTP मिळेल तो OTP देऊ नका. तुम्ही त्यांना पाठवलेला OTP नंबर सांगितल्यास ते तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करतील, त्यामुळे कोणीही अनोळखी व्यक्तीने OTP मागितल्यास ते सांगू नये . असा इशारा सायबर क्राईम पोलीस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी यांनी दिला आहे







