संग्रामसिंह (आण्णासाहेब )जयसिंह मोहिते पाटील यांची शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपदाची यशस्वी वर्षपूर्ती अकलूज (प्रतिनिधी )*संग्रामसिंह (आण्णासाहेब )जयसिंह मोहिते पाटील यांची दिनांक 8.10.2021 रोजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. अध्यक्ष पदी निवड होवून आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्याबद्दल आपणांस हार्दिक शुभेच्छा…* या एक वर्षात आपण अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर येथे नवीन वर्गखोल्या बांधकाम, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथील मुलींसाठी नवीन लेडीज टॉयलेट बांधकाम, जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज येथील मुलींसाठी नवीन लेडीज टॉयलेट बांधकाम, हनुमान विद्यालय, लवंग येथे वर्गखोल्या बांधकाम अशा प्रकारे विविध प्रकारची कामे करून विद्यार्थ्यांना व शाखांना असणाऱ्या उणिवा भरून काढल्या आहेत. त्याचप्रमाणे *न भूतो न भविष्याती असा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा* कार्यक्रम आपण अगदी योग्य व बारकाईने लक्ष्य देवून नेत्रदिपक सोहळा पार पाडला. आज पर्यंत झालेले कार्यक्रम ह्याचा पेक्षा हा कार्यक्रम वेगळाच होता, कारण या कार्यक्रमात संपूर्ण अकलूजकर सहभागी करून आपण घेतले होते. संपूर्ण अकलूजकरांची मने आपण जिंकलीत यात मात्र शंका नाही. अशा प्रकारे अनेक प्रकारची विविध कामे आपण केलेली आहेत.त्याचे लिहायचे म्हटले तर खूप मोठा आलेख होईल. त्यामुळे वरीलप्रमाणे फक्त ठळक कामांची माहिती घेतली आहे. अध्यक्ष होण्यापूर्वी संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली. विविध स्पर्धा आयोजित केल्या. त्याचीच पोच पावती म्हणून जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील यांनी त्यांच्यावर अध्यक्ष पदाची धुरा सोपविली. आणि त्यांनी देखील एक वर्षात तो विश्वास सार्थ ठरविला आहे. . आण्णासाहेब आपले हातून अशा विविध प्रकारची कामे घडोत व आपले कार्याचा हा आलेख असाच वर-वर जावो हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो.
.*पुनश्च: एकदा अध्यक्ष वर्षपूर्ती बद्दल आपणांस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.* 💐💐💐







