मौजे केम ता.करमाळा येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची आ.रणजितसिंह मोहिते पाटील व मा.आ.नारायणआबा पाटील यांनी पहाणी केली.केम परिसरातील उडीद, मका,तुर,कांदा ,ऊस पीकाखालील सुमारे ३५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.अनेक ठिकानी ओढ्याकाठच्या जमिनी खरवडुन गेल्या आहेत सर्वांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कोणतेही निकष न ठेवता पंचनामे करण्याचे संबधित अधिकार्यांना आमदार महोदयांनी सुचना केल्या.प्रसंगी गावातील कुंकु कारखानदार,व्यापारी,रेल्वे प्रवासी यांनी विविध समस्या मांडल्या त्या सोडवण्यासाठी अधिकार्यांशी चर्चा करुन केमच्या सर्वांगीन विकासासाठी कटीबद्ध असल्याचे अश्वस्त केले. यावेळी मा.जि.अध्यक्ष अनिरुध कांबळे,मा.जि.प.सदस्य दिलीपदादा तळेकर,मा.जि.प,सभापती शिवानाना कांबळे,मा.जि.प सदस्या सवीताराजे भोसले,भारतनाना पाटील,अजित तळेकर मा.पं,स सभापती शेखर गाडे,सरपंच अकाश भोसले,उपसरपंच नागन्नाथ तळेकर,प्रहार चे ता.अध्यक्ष संदीप तळेकर,रेल्वे प्रवासी संघटनेचे मनोज सोलापुरे,राजेंद्र गोडसे,सुदर्शन तळेकर,मनोज तळेकर,बाळासाहेब बिचितकर,सचिन बिचीतकर,गणेश तळेकर,सागर नागटीळक,धनंजय ताकमोगे,कृषी अधिकारी,सर्कल तलाठी,ग्रामसेवक आदि उपस्थित होते.












