*शंकरनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र की डाॅग हाऊस आहे का असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. ?*संग्रामनगर दि.८ (प्रतिनिधी)शंकरनगर (ता.माळशिरस) येथील भारतीय स्टेट बँकेचे फुले एस टी डी सेंटर समोर एटीएम केंद्र असून त्या केंद्रात प्रवेश करताना एटीएम कार्डधारकांना येथील दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.तोंडाला रूमाल धरून ग्राहकांना येथे प्रवेश करावा लागत आहे.हे एटीएम केंद्रात नेहमीच अस्वच्छ व भरपूर कचरा असतो.तसेच या एटीएम केंद्रात कुत्र्याच्या पिल्लाने घर केल्यामुळे हे डॉग हाऊस ? असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. भारतीय स्टेट बँक म्हणजे सर्व बँकांची मातृ बॅक म्हणून समजले जाते.म्हणुन या बँकेकडे शासन स्थरावर जनता मान्य बॅक आहे.पण बॅंकेतील अधिकारी स्थरावर ग्राहकांना सेवा देणेबाबत कमी पडत आहेत.त्यामुळे” स्वच्छ भारत ” अभियनालाच हरताळ फासायचे काम केले जात आहे.या एटीएम केंद्रात ग्राहकांसोबत येणा-या लहान बालकांना अशा बेवारस कुत्री,घाणीच्या साम्राज्यांचा सामना करावा लागत आहे.या बाबत ग्राहकातून या एटीएम बद्दल पुर्ण नाराजी आहे.अशा सेवेमुळे ग्राहक या केंद्राकडे पाठ फिरवीत आहेत.त्यामुळे अधिकारी वर्ग या एटीएम केंद्राची दखल कधी घेणार ? हा प्रश्न ग्राहकांसमोर पडला आहे.







