*शहिद निवृत्ती जाधव यांचा स्मृतीदिन विविध उपक्रमांनी साजरा.**अकलूजचे पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर व उपमुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे यांना शहीद निवृत्ती जाधव स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित*
संग्रामनगर दि.८ (केदार लोहकरे अकलूज)श्रीपूर तालुका माळशिरस येथील शहीद इन्स्पेक्टर निवृत्ती जाधव यांचा 13 वा स्मृतिदिन त्यांच्या स्मारका वरती विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी अकलूज पोलिस स्टेशनचे पी.आय.अरुण सुगावकर यांनी सेवेत असताना,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल व श्री.चंद्रशेखर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना दिलेले प्रशिक्षण व मार्गदर्शन केल्याबद्दल शहिद निवृत्ती जाधव स्मृतीगौरव पुरस्काराने देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉक्टर लक्ष्मण आसबे यांनी पोलिसांचे व शहिदांच्या कुटुंबीयांची परस्थितीत विद्यार्थ्यांपुढे आपल्या भाषणांमधून मांडली. श्री.चंद्रशेखर विद्यालयात आज सकाळी ग्रामस्थांनी शहीद जवान ज्योत प्रज्वलित करून गावांमधून भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली.शहीद निवृत्ती जाधव अमर रहे,भारत माता की जय या घोषणा देत परिसर दणाणून गेला होता.यावेळी शहीद निवृत्ती जाधव यांच्या स्मारकावरती त्यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवर,सर्व ग्रामस्थ,विद्यार्थी यांनी सलामी व श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमासाठी महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण,कामधेनु परिवाराचे संस्थापक डॉ.लक्ष्मण आसबे,वीरपत्नी सुरेखा निवृत्ती जाधव,आबासाहेब देशमुख चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉ. रामदास देशमुख,सचिव भारत कारंडे,गटनेते नगरसेवक राहुल रेडे,शारदाताई पाटील,मोहसीन पठाण,शिवाजी रेडे,मौला पठाण,पैलवान अशोक चव्हाण,नामदेव पाटील,विक्रम लाटे,सोमनाथ एकतपुरे,नितीन वाघमारे,शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम माने,महाळुंगचे मंडलाधिकारी लोखंडे,माजी मुख्याध्यापक नागनाथ वाघमारे,माजी पर्यवेक्षक माधव साठे,बाळासाहेब कामटे,अमरसिंह पिसाळ देशमुख,भाग्यवंत नायकुडे,दत्ता दोरगे,इब्राहिम शेख,गणेश कारंडे,नितिन रास्ते पो.कॉ.चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चंद्रशेखर विद्यालयाचे सर्व अधिकारी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,शहिद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या सचिव सारिका नाईकनवरे,धर्मेश जाधव,सविता नाईकनवरे,प्रेरणा जाधव,रवींद्र नाईकनवरे,यांनी परिश्रम घेतले.








