*प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी ; धैर्यशील मोहिते पाटील**शिवामृत येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
प्रतिनिधी/अकलूजआजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची वेळच्यावेळी तपासणी करून घेवून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे मत शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.विजयनगर अकलूज येथील शिवामृत दूध संघ येथे रोटरी क्लब अकलूज व उपजिल्हा रुग्णालय अकलूज व योगेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड व लिंक वर्कर स्कीम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवामृत येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिवामृत दुध संघा मधील सर्व कामगारांच्या रक्ताच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या व यावेळी लिंक वर्कर कमल इंगळे यांनी विविध आजारा विषयी जनजागृतीपर माहिती दिली..याप्रसंगी पुढे बोलताना मोहिते पाटील म्हणाले की,आजचे युग हे धावपळीचे युग आहे.त्यामुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.यासाठी योग्य वेळी तपासण्या करून घेतल्या तर पुढील अनर्थ टळतात.यासाठी वेळेवर तपासणी करून घेत प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी.या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष दिपक फडे , कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, सेक्रेटरी दिग्विजय माने पाटील ,ICTC चे टेक्निशियन सुंदर गायकवाड व लिंक वर्कर कमल इंगळे हे उपस्थित होते.









