*मूल्यं हरवित चाललेल्या समाजात संवादासाठी पारंपरिकता जपण्याची आवश्यकता… प्राचार्या सौ. जयश्री धुमाळ*
संग्रामनगर दि.७ (केदार लोहकरे यांजकडून)शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविदयालय अकलूज ज्युनियर विभाग व सिनीयर विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या भोंडला कार्यक्रमाच्या प्रसंगी महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण संस्कृतीत निर्माण झालेले सण,समारंभ,पारंपरीक खेळ रुढी परंपरा हे समाजाला,कुटुंबाला एकत्र आण्याबरोबरच मनोरंजनाचा महत्वाचा भाग बनलेले होते.पूर्वीच्या काळात संपर्काची साधने कमी होती त्यामुळे माणसां माणसांमध्ये संवाद व्हायचा किंवा उशिरा का होईना पण व्हायचा.आज संपर्काची साधने प्रचंड आली आहेत.आता तर मोबाईलसारख्या साधनाला ख-या जीवनात अत्यंत महत्व आले असून त्यामुळे ख-या जीवनाचे महत्व कमी झालेले आहे.माणसे जगण्याचा सोहळा करण्यापेक्षा मोबाईलवर स्टेटस ठेवण्यासाठी जगायला लागली आहेत कि काय अशी ही भावना त्यांनी व्यक्त केली. या काळात परतीच्या पावसाला सुरूवात होवून हस्त नक्षत्र निघालेले असते.म्हणूनच समृध्दतेचे प्रतिक असलेल्या हत्तीचे पूजन या खेळात करून खिरापत देवून भोंडला, हादगा….असे पारंपरीक खेळ खेळले जातात.महाराष्ट्राच्या विविध भागात या खेळाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.जसे भुलाबाई,हदगा होय असे पारंपरिक खेळ किंवा सण समारंभ केवळ महिला मुलींच्यासाठी आवश्यक आहेत असे नाही तर समाज व कुटुंबात एकोपा रहावा यासाठी आवश्यक आहेत असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दत्तात्रय बागडे होते तर डॉ.विश्वनाथ आवड डॉ.अपर्णा कुचेकर यांचेसह सिनीयर व ज्युनियर विभागातील प्राध्यापिका उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आयोजन प्रा.सुलोचना देशमुख मॅडम केले. यावेळी विविध पारंपरिक गाणी,खिरापत ओळखणे,नृत्य अशा दोन तास चाललेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा सुलोचना देशमुख यांनी केले तर प्रास्तविक प्रा.पदमा रहाटे मँडम यांनी केले. आभार प्रा.घोंगडे मॅडम यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यलयीन अधिक्षक युवराज मालुसरे यांचे सहकार्य लाभले तसेच याकार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापिका वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व मिरासदार मॅडम उपस्थित होत्या.









