हनुमान दूध संस्थेकडून सभासदांना दिवाळीसाठी लाभांश.
संग्रामनगर दि.६ (केदार लोहकरे यांजकडून)
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील हनुमान दूध व्यावसायिक संस्थेने यंदाच्या दिवाळीसाठी सभासदांना प्रति लिटर ७५ पैसे लाभांश देण्याचा निर्णय घेतला असून सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व भाजपा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तांदुळवाडी येथील हनुमान दूध व्यवसायिक संस्था कार्यरत असून आज संस्थेच्या दुध संकलन केंद्रावर विजया दशमी दसऱ्याच्या निमित्ताने श्री हनुमान प्रतिमेचे पुजन दुध उत्पादक बाबुराव मिले व दुध संकलन साहित्य व काट्याचे पुजन संस्थेचे संचालक नामदेव लक्ष्मण धनवडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. हनुमान दुध संस्थेने २ एप्रिल २०२२ पासुन पुन्हा दुध संकलन सुरु केले असुन दुध उत्पादकांना तांदुळवाडी मध्ये दुध दरामध्ये जुलै अखेर २ रुपया जादा दर व आॅगस्ट पासुन १ रुपया ५० पैसे जादा दुध दर दिला आहे.जादा दर देवुन सुद्धा एप्रिल ते जुन अखेर आलेल्या दुधावर प्रति लिटर ७० पैसे लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.अल्पावधीतच ७० पैसे लाभांश देवुन २०२३ च्या दिपावलीला पण कायम १ रुपया जादा दर देवुन १ रुपयाच्या वर लाभांश देण्याचा प्रयत्न करु असे चेअरमन बापु डोके यांनी सांगितले.सभासदांचे हित लक्षात घेवून काटकसरीने पारदर्शक व्यवहार करु असेही ते म्हणाले.
यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा संस्थेचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पवार,शिवामृतचे संचालक नवनाथ निलटे,सुरेश आबा ऊघडे,बाबा राजे,बापु बाबर,आरिफ मुलाणी,दादा बाबर व दुध उत्पादक मान्यवर उपस्थित होते.







