अकलूज येथील श्रीराम नवरात्र मंडळ यांचे वतीने सामाजिक कार्यकर्ते हमीद मुलाणी व डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
अकलूज (प्रतिनिधी )अकलुज येथील नंदकुमार माने पाटील नगर परिसरातील सर्व भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गा माता देवीचे दर्शन सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी चे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतले.नवरात्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीभाऊ दोरकर व मंडळाचे विद्यमान अध्यक्ष .युवराज ( दादा ) दोरकर यांनी मोहिते पाटील यांचा पुष्पहार व फेटा बांधून सत्कार केला.यावेळी त्यांनी मंडळाचे कौतुक केले.९ दिवस नवरात्रात राबविलेले.विविध कार्यक्रम ज्यात रांगोळी स्पर्धा.जय जवान.तुझे सलाम हा.एक तासांचा जिवंत देखावा.संगीत खुर्ची.डांस स्पर्धा.इत्यादि कार्यक्रम आयोजित केलेबद्दल.मंडळाचे अध्यक्ष युवराज दोरकर.व मंडळाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले.. यावेळी मंडळाचे वतीने वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र पैसा हे सर्वस्व न मानता रुग्णांवर केलेल्या उपचार तसेच समाजसेवेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ.ज्ञानेश्वर पाटील यांचा.व सामाजिक.राजकीय. सोशल मिडियाचे माध्यमातून.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने परिसरातील सर्व क्षेत्रात आपले एक वेगळेच स्थान निर्माण करणारे एक शांत संयमी व्यक्तीमत्व असणारे हमीदभाई मुलाणी या दोघांना *समाजभूषण* ” या पुरस्काराने मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने उपस्थित होते.मंडळाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली..हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष युवराज दोरकर.अजय वाईकर.विशाल भोसले.प्रविणभैय्या भोसले.विक्की भोसले.अविनाश वाईकर.व मंडळाच्या सर्व पदाधिकारी व का अहोरात्र मेहनत घेतली.मंडळाचे हे २८ वे वर्षे आहे.. दरवर्षी या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात.या मंडळाला अकलुज ग्रामपंचायत व नगरपरिषद चे अनेक पुरस्कार व बक्षिसे मिळाली आहेत.







