श्री गणपती फार्मसी महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या औषधनिर्माणशास्त्र प्रवेश सुविधा केंद्रास ( फेसिलिटेशन सेंटर) मान्यता अर्ज पडताळणी व निश्चिती सुविधा केंद्रावर करणे बंधनकारक
अकोले (खु) प्रतिनिधी. गणपती फार्मसी महाविद्यालय, टेंभुर्णी येथे औषधनिर्माणशास्त्र पदविका व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या प्रथम वर्ष बी.फार्मसी व थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसी अभ्यासक्रमासाठीच्या केंद्रीय मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी व मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाकडून अर्ज सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर )म्हणून मंजुरी मिळाली असून महाविद्यालयामध्ये सुविधा केंद्र(FC center code 6954) विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन व मूळ कागदपत्रे पडताळणी व निश्चिती होणार आहे अशी माहिती संस्थापक सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे व प्राचार्या डॉ. रूपाली आर. बेंदगुडे यांनी दिली. या सुविधा केंद्रामध्ये बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदवी बी.फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशाकरिता अर्ज दिनांक २८/०९/२०२२ ते ०३/१०/२०२२ दरम्यान स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://ph2022.mahacet.org या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे .या वेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे व सुविधा केंद्राचे समन्वयक प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. शिवराज ढगे व मनेश बोडके उपस्थित होते.अधिक माहितीसाठी संपर्क: ७७४५०८२७५४, ९५४५५५३६९०.








