*अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयात महाभोंडला कार्यक्रमाचे संपन्न.*
संग्रामनगर दि.३० (केदार लोहकरे यांजकडून)अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयात आज महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यालयातील महिला शिक्षिका व मुलींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. पुर्वीच्या काळापासून चालत आलेल्या पारंपरिक सण समारंभाची माहिती मुलींना शालेय जीवनात व्हावी व आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे तसेच हिंदू संस्कृतेतील सण समारंभाची मुलींना लहान वयातच मनात रूजावेत या उद्देशाने विद्यालयात महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव पाटील व उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे यांचे हस्ते हस्तीचे पूजन करण्यात आले.या महाभोंडला कार्यक्रमात २५ शिक्षीका व ७५० मुली सहभागी झाल्या होत्या. यावेळी गोल फेर धरू महिला शिक्षीकांनी ऐलमा पैलमा गणेश देवा…एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू… श्रीकांता कमलकांता…अशी अनेक गाण्यांनी सदाशिवराव माने विद्यालयाचा परिसरात दुमदुमून निघाला होता.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलींना खिरापत वाटण्यात आली.










