श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये औषध निर्माता दिन साजरा.
मौजे अकोले (खु),ता माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमाने जागतिक औषध निर्माता दिन साजरा करण्यात आला. जगभरामध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन हा २५ सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुधारण्यासाठी फार्मासिस्टच्या भूमिकेला प्रोत्साहन आणि समर्थन देणारे उपक्रम आयोजित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी शहरामध्ये दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व माढा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅली काढण्यात आली. या भव्य रॅलीचे उद्घाटन सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक टेंभुर्णी,राहुल काळे अध्यक्ष माढा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, संस्थेचे सचिव डॉ.आर.डी. बेंदगुडे,अध्यक्ष ॲड.विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर औषध निर्माण क्षेत्रात व्यवसाय करणारे फार्मासिस्ट बांधव सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी फलकाद्वारे औषधनिर्मात्याचे आरोग्य सेवेतील महत्त्व तसेच या क्षेत्रातील करिअरच्या संधी याबद्दल संदेश दिला. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा.प्रशांत मिसाळ तसेच प्रा. कोमल यादव यांचे योगदान लाभले.







