माळशिरस येथे कु.श्रृती राजेंद्र वाणी हिचे सी.ई.टी.परिक्षेत सुयश.
संग्रामनगर दि.२७ (केदार लोहकरे यांजकडून)माळशिरस येथील प्रेसफोटोग्राफर राजेंद्र वाणी यांची कन्या कु.श्रृती वाणी हिने सी.ई.टी परिक्षेमध्ये ९६.४४ टक्के गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल माळशिरस येथील फोटोग्राफर संघटनेच्या वतीने तिचा फेटा हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कु.श्रृती वाणी हिचे माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशालेत प्राथमिक,माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण झाले असून.इयत्ता बारावीमध्ये तीने ८२ % गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक पटकावला होता.त्यानंतर दिलेल्या सी.ई.टी.परिक्षेत ९६.४४ टक्के गुण मिळवून हे यश संपादन केले आहे.त्याबद्दल माळशिरस शहर फोटोग्राफर संघटनेच्या वतीने तिचा नुकताच सत्कार करण्यात आला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माळशिरस शहर फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष रणजित धाईंजे,उपाध्यक्ष बापू रूपनवर, राजेंद्र वाणी,रवि वाणी, सोमनाथ वाणी, नागेश होनराव, मंगेश होनराव,भाग्यवंत भालेराव,गणेश सुळ, प्रसाद महामुनी,बापू बर्गे,भारत जवंजाळ,शशी म्हमाने,सौ.महानंदा राजेंद्र वाणी,श्रीराज वाणी,अवधूत वाणी आदी उपस्थित होते










