*गणपती फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन*
मौजे अकोले (खु), तालुका माढा येथील श्री गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात 25 सप्टेंबर 2022 रोजी जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालय व माढा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या समन्वयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली. देशभरामध्ये आरोग्य सेवा सुधारण्यासाठी फार्मासिस्टच्या भूमिकेला प्रोत्साहन आणि समर्थन देणारे उपक्रम आयोजित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गणपती फार्मसी चे सचिव डॉ. रविंद्र बेंदगुडे आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन माढा तालुका अध्यक्ष श्री. राहूल काळे यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॕड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे प्राचार्या रूपाली बेंदगुडे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अक्षय भेंकी, प्रा. मोनिका माळी उपस्थित होते.







