*संगम येथे आट्यापाट्या स्पर्धेत माजी खेळाडूंचा सन्मान सोहळा संपन्न.*
संगम तालुका माळशिरस येथील श्री हनुमान आट्यापाट्या संघ, शिवप्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ संगम यांच्यावतीने आयोजित आट्यापाट्या स्पर्धेत माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, इंदापूर, माढा, करमाळा आदी तालुक्यातील सुमारे ४५ संघांनी सहभाग घेतला. *प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्या कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील* यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी आट्यापाट्या खेळातील जिल्ह्यातील नामवंत माजी खेळाडूंचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी जय बिरोबा कचरेवाडी (माळशिरस) विरुद्ध चंद्रकांत सत्रे नांदोरे (पंढरपूर) या दोन संघात सलामीचा सामना झाला. या चुरशीच्या सामन्यात जय बिरोबा कचरेवाडी संघ विजयी झाला. या विजयी संघास प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर -अकलूज च्या वतीने रोख रुपये ५०००/- देऊन गौरव करण्यात आला.आपल्या अध्यक्षीय मनोगतात *मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील* यांनी सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या व माजी खेळाडूंना सन्मानित करून उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेत कचरेवाडी, वाघोली, पंधरा सेक्शन, सांगवी, लव्हे , काळमवाडी, नांदोरे, वेळापूर उंबरे, पंढरपूर, शिरढोण, कोळेगाव, पटवर्धन कुरोली, लवंग, फळवणी, गिरवी, नेवरे, लवंग सेक्शन, पागे उंबरे, नरसिंहपुर, बाभुळगाव, माळेगाव इत्यादी संघांनी सहभाग नोंदविला आहे. सदर स्पर्धेसाठी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांकासाठी अनुक्रमे २५००१, २००१, १५००१, १०००१, ५००१ व चषक या प्रकारची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यावेळी प्रताप क्रीडा मंडळाचे सचिव पोपट भोसले-पाटील, खजिनदार वसंत जाधव व संचालक, सदस्य, तसेच विठ्ठलराव ताटे, नारायणराव ताटे, केशवराव ताटे, मधुकर ताटे, बाळासाहेब महाडिक, संदीप महाडिक, बाळासाहेब जाधव, शिवाजी इंगळे, हनुमंत महाडिक समस्त ग्रामस्थ संगम व पंचक्रोशीतील आट्यापाट्या प्रेमी खेळाडू व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सरवदे यांनी केले तर आभार चंद्रशेखर ताटे यांनी मानले. स्पर्धेचे समालोचन ए .एम. अडसूळ व बापू लोहकरे यांनी केले.











