वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अकलूज नगरपरिषदेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर- आ.रणजितसिंह मोहिते-पाटील
अकलूज (प्रतिनिधी ): नगरविकास विभागाच्या वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून राज्याचे मुख्यमंत्री तथा नागरी विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकलूज नगर परिषदेसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.अकलूज नगरपरिषदेसाठी राज्य संवर्गामध्ये आकृतीबंध मंजूर झाला आहे. त्याकरिता नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये कर्मचार्यांकरिता प्रशस्त बैठक व्यवस्था आणि कार्यालयीन सभागृहाकरिता फर्निचर साहित्य इत्यादी कामाकरिता वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करण्यासंदर्भात नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. सदर निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार एकनाथ शिंदे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्या संदर्भातील शासन निर्णय काल दिनांक 23 सप्टेंबर रोजी उपसचिव श्रीकांत आडगे यांच्या सहीने पारित करण्यात आला असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.







