

अकलूज/प्रतिनिधी; श्रीपुर तालुका माळशिरस येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर पंधरवडा साजरा केला जात आहे. त्यानिमित्त श्रीपुर येथील निदान हॉस्पिटल येथे भारतीय जनता पार्टी प्रज्ञा सेल यांच्या वतीने भाजपाचे जिल्हा संघटन चिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पंधरवडा साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा प्रज्ञा सेल तालुका अध्यक्ष डॉक्टर हरिश्चंद्र सावंत पाटील यांच्या हस्ते धैर्यशील मोहिते पाटील यांचा सन्मान करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा मध्ये माळशिरस तालुक्यात दोन ठिकाणी रक्तदान शिबिर, जल जीवन सप्ताह मध्ये नागरिकांची जनजागृती करण्यात येणार आहे, तसेच स्वच्छता परिसर सप्ताह मध्ये आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे, त्याचबरोबर २८ सप्टेंबर रोजी फोंडशिरस नेत्रदान शिबिर तसेच नरेंद्र मोदी यांची आर्थिक नीती व परराष्ट्र धोरण या विषयावर एक तारखेला बुद्धिजीवी लोकांचे संमेलन होणार आहे या कार्यक्रमाला सुरज मस्के तालुका सरचिटणीस ,अमित पुंज महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील, कारखाना संचालक व नगरसेवक नानासाहेब मुंडफणे, अशोकराव चव्हाण, नगरसेवक निनाद पटवर्धन, तानाजी भगत, सोमनाथ मुंडफणे, तसेच मोहसीन पठान, डॉ. संजय लाटे, जालिंदर लोखंडे, माजि जि प सदस्य अरुण तोडकर, अरुण पवार, राजू मामा जाधव, रतनसिंह राजपूत, युनियनचे अनंत जाधव, संजय पवार, जयकुमार जाधव, संदीप घाडगे, नागेश भोसले, सुहास गाडे, डॉ. जावेद मुल्ला, डॉ. विजय डहाळे, डॉ. जितेंद्र गायकवाड,डॉ. भारत गायकवाड, डॉ. प्रमोद पवार , अभिनंदन गायकवाड, असिफ शेख, भालचंद्र शिंदे ,रमेश देवकर ,बजरंग भोसले, रशीद शेख, राहुल जगताप, मानसिंग रेडे, संजय पाठक, सचिन सावंत ,गोटू देऊस्कर, भारत रणसिंगे ,सौ शोभा मनोहर सौ कल्पना कुलकर्णी,सौ. सोनाली सुमंत,सौ. सीमाताई भोसले, शितल मिस्कर, माधुरी खुणे, स्नेहल बनसोडे, माऊली भोसले, बाळासाहेब कमते, कल्याण रजपूत, अमोल बनसोडे, अनिकेत पवार, अनिल सुरवसे, लखन रेडे ,बंडू कोकीळ शंकर लोंढे ,अमोल मिसाळ, नितीन मिस्कर, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







