निरोगी जीवनशैलीसाठी योग्य सकस आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा – डाॅ.आदिती थिटे
अकलूज (प्रतिनिधी) :वयात येणा-या मूला-मुलींच्या शरीरात हार्मोन्सची वाढ होत असल्याने शरीरिक बदल घडतात व या बदलाची माहिती त्यांना वेळीच होणे गरजेचे असते. योग्य सकस आहार, नियमित व्यायाम करुन शरीराची योग्य ती काळजी घेतली तर निश्चितच आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारता येते असे प्रतिपादन डाॅ.आदिती थिटे यांनी केले.शंकरनगर-अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संकुलात शिवरत्न शिक्षण संस्था संस्था व रोटरी क्लब अकलूज, इनरव्हिल क्लब अकलूज, उपजिल्हा रुग्णालय आणि हिंद लॅब इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संकुलात शिक्षण घेणा-या विविध संस्थातील मुलींच्या रक्त तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर तसेच केस गळती आणि तारुण्य पिटिका या विषयावरील डॉ.थिटे यांचे व्याख्यान अशा त्रिसूत्री कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना डाॅ.आदिती थिटे बोलत होत्या.यावेळी शिवामृत उत्पादक संघ अकलूज चे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डाॅ.श्रध्दा जवंजाळ, डाॅ.वैष्णवी शेटे, डाॅ.आनंद फडे, अमोलिका जामदार, शुक्ला दोशी, रोटरी क्लब चे अध्यक्ष विधीतज्ञ दिपक फडे, सचिव केतन बोरावके, माजी सचिव गजानन जवंजाळ, डॉ.अमोल फडे, योगेश व्होरा, प्राचार्य डाॅ.अरविंद कुंभार, लॅब टेक्निशियन सुंदर गायकवाड, गौरी मोरे, मोहिनी माने आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डाॅ.श्रध्दा जवंजाळ यांनी आरोग्य तपासणी शिबाराविषयी विस्तृत माहिती सांगितली. तर डॉ. अमोल फडे यांनी रक्त तपासणी शिबिरा विषयी विस्तृत माहिती सांगितली. सूत्रसंचालन प्रा. धनश्री हातोळकर यांनी केले, तर आभार अमोलिका जामदार यांनी मानले. या शिबीरात शिवरत्न शिक्षण संकुलातील मुलींची आरोग्य तपासणी बरोबरच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.या शिबिरासाठी शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज विभागाचे तसेच ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी आणि विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग ॲन्ड मेडिकल इन्स्टिट्यूट मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष सहकार्य लाभले.









