*शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश मिडीयम व शिवरत्न स्कूल मध्ये आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धा संपन्न*
अकलूज/प्रतिनिधी ; शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व शिवरत्न सीबीएसई स्कूल मध्ये इंटर स्कूल कल्चरल कॉम्पिटीशन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष शितलदेवी मोहीते पाटील यांचा विद्यार्थांना उद्देशून पाठवलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले “विद्यार्थ्यांचे कलागुण योग्य वयात फुलविण्याची संधी मिळावी त्याच्या कलेच्या सादरीकरणास रंगमंच मिळावा यासाठी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले आहे विद्यार्थ्यांनी स्वत:मधील कलेला मुक्त वाव देऊन स्पर्धेत सहभागी व्हावे म्हणत विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.शालेय गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासाची वाटचाल व्हावी म्हणून आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेत विविध वयोगटात समुह नृत्य,वैयक्तिक नृत्य,समुह गायन,वैयक्तिक गायन,समुह कलाविष्कार,नाटक व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.वेळेस प्रिन्सिपल अल्बर्ट थरकन, शिवरत्न स्कूल च्या प्रिन्सिपल बिनो पाऊलस, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









