*अल्झायमरच्या रुग्णांना आधार देणे गरजेचे ; डाॅ.हराळे*
अकलूज / प्रतिनिधी; अल्झायमर पूर्ण बरा होण्यासाठी उपचार उपलब्ध नाहीत; पण डिमेन्शिया नियंत्रित करता येतो अल्झायमरच्या रुग्णांना मानसोपचार पद्धतीद्वारे वैद्यकीय व कौटुंबिक अधार देणे गरजेचा असतो असे डाॅ.निवांत हराळे म्हणाले ,शिवरत्न शिक्षण संस्था संचलित विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या करीता जागतिक अल्झायमर रोग निवारण दिना प्रंसगी अकलूज मधील मानसोपचारतज्ज्ञ डाॅ.निवांत हराळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.डाॅ.हराळे यांनी अल्झायमर विषयी सांगितले,या आजाराची सुरुवात साधारणपणे वयाच्या साठ वर्षांनंतर होते. अनुवंशाने हा आजार झाला असेल तर काही वेळा वयाच्या ३५ ते ४० व्या वर्षीसुद्धा या आजाराची लक्षणे दिसू लागतात. विसरभोळेपणाशिवाय या रुग्णांना फारशा शारीरिक व्याधी नसतात. त्यामुळे पहिल्या-दुसऱ्या टप्प्यातील आणि काही वेळा तिसऱ्या टप्प्यातील रुग्णांना छोट्या-छोट्या अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी करून घेणे, घरातील छोट्या कामांमध्ये, छंदांमध्ये गुंतवणे, संगीत, योगा, नृत्य, छोटे व्यायाम प्रकार यामध्ये त्यांचा वेळ जाईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अल्झायमरच्या रुग्णांना काही ग्रुप अॅक्टिव्हिटीज मध्येसुद्धा सहभागी करून घेता येते.विस्तृत व उपचार पद्धतीची माहीती विद्यार्थांना सांगत डाॅ.हराळे यांनी मार्गदर्शन केले.या वेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद पाटील अकॅडमीक कॉर्डिनेटर शिवतीर्थ हिरेमठ प्राध्यापक विराट गोरे, प्राध्यापक रूपाली वाळके , तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.







