महामार्ग पोलिस मद्दत कक्ष वडगाव मावळ पोलीस अधिकारी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तळेगाव टोल नाक्यावर वाहनांकडून करतात बेकायदेशीर पैसे (लाच) वसूल
प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?
पुणे प्रतिनिधी (आप्पा लोखंडे) – मुंबई वरुन पुण्याकडे जाणाऱ्या एक्सप्रेस हायवे तळेगाव टोल नाक्याच्या पुढे महामार्ग पोलिस मद्दत कक्ष यांच्या हद्दीत मुंबई वरुन येणाऱ्या वाहनांना थांबवून घेतले जात आहे व लायसन्स पेपर इत्यादी ची चौकशी करण्यात येत आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्या वर दंडात्मक कारवाईची धमकी देऊन (लाच) पैसे घेतले जात आहेत पैसे दिले नाहीतर (online) ऑनलाईन दंड वाहणांवरती टाकला जात आहे अशा पोलीस अधिकाऱ्याला वाहने थांबवण्याचा व पैसे गोळा करण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्याने दिला आहे अशा संबंधित पोलिस अधिकारी यांच्या वर कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासन करणार का ?
मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर पणे पोलीस अधिकारी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कर्मचारी व झिरो पोलीस यांच्या कडून बेकायदेशीर पणे वाहने अडवून पैसे ऊखाळण्याचे काम चालू आहे तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कर्मचारी यांच्या कडे पोलीस अधिकारी पोलिस वाहन ताब्यात घेऊन गाडीचा पाठला करून पैसे ऊखाळण्याचे काम चालू आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी या अधिकारी यांच्यावर कारवाई करणार का?
तसेच पुणे कडून मुंबई कडे खंडाळा घाटात रात्री वेळी अवजड वाहने (ओ.डी.सी.) सोडण्यास परमिशन नसतांना पैसे घेऊन सोडल्या जातात त्यामुळे अलीकडच्या काळात अपघात चे प्रमाण वाढले आहे असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या वर मा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे











