• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांचा “धैर्यशील बाणा” रुपेरी पडदयावर अनुभवायला मिळणार.विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या “शिवप्रताप- गरुडझेप” या चित्रपटाचे अकलूज मध्ये जोरदार प्रमोशन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 22, 2022
in महाराष्ट्र
0
छत्रपती शिवाजी महाराजांचा “धैर्यशील बाणा” रुपेरी पडदयावर अनुभवायला मिळणार.विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या “शिवप्रताप- गरुडझेप” या चित्रपटाचे अकलूज मध्ये जोरदार प्रमोशन
0
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती शिवाजी महाराजांचा “धैर्यशील बाणा” रुपेरी पडदयावर अनुभवायला मिळणार.विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या “शिवप्रताप- गरुडझेप” या चित्रपटाचे अकलूज मध्ये जोरदार प्रमोशन

अकलूज (प्रतिनिधी )सध्या मराठी चित्रपटाला सोन्याचे दिवस आले आहेत. चित्रपटगृहात हाउसफुल्ल चे बोर्ड झलकत आहेत.मराठीत एकापोठापाठ एक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत . गेल्या काही वर्षापासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे. त्यातच आता अभिनेते आणि निर्माते डॉ. अमोल कोल्हे हे विजयादशमी च्या मुहूर्तावर नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. यानंतर आता अमोल कोल्हेंच्या या ऐतिहासिक चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याचा टीझरही समोर आला आहे.डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप- गरुडझेप’ या चित्रपटाचा आणखी एक टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमोल कोल्हेंचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतारातील देखणा लूक पाहायला मिळत आहे.सदर चित्रपटात रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करण्यात येणार आहे. यात डॉ अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा ‘शिवप्रताप’ मालिकेतील ‘गरुडझेप’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता या चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, मराठी मातीचा संस्कार, आग्राभेटीचा थरार! शिवप्रताप गरुडझेप – ५ ऑक्टोबर २०२२.रोजी चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार आहे.येत्या विजयादशमीच्या मुहूर्तावर म्हणजे ५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.दरम्यान डॉ.अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. हा टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.जिजाऊंच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आहेत.तर क्रूर मुघल बादशहा औरंगजेब च्या भूमिकेत यतीन कार्येकर हे दिसणार आहेत.अकलूज च्या कलाकारांचे आश्रयदाते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तालमीत व डॉ. विश्वनाथ आवड (सर )यांच्या मार्गदर्शन खाली तयार झालेले अकलूज चे हरहुन्नरी कलाकार अजय तपकीरे हे बहिर्जी नाईक ची भूमिका साकारीत आहेत. सध्या तुफान व्हायरल होत असलेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातील टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. औरंगजेबाने आपल्या अमानुष अत्याचाराने रयतेला घाबरून सोडले होते.सळो की पळो करून सोडले होते.या टीझरमध्ये औरंगजेब उत्तरेत हिंदू मंदिरे पाडताना आणि प्रजेवर अन्याय करताना दिसतो. “तेरा ईश्वर तो नही आया तुझें बचाने, कौन आएगा” असं म्हणताना दिसतो. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील डेअरिंगबाज एंट्री पहायला मिळते. “यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी घाला घालेल.त्याचे हात मुळासकट उखडून देण्याची धमक आम्ही बाळगतो..!” अशा कडक शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सुनावले. सह्याद्रीच्या सिंहाची ही शिवगर्जना’ प्रदर्शित झालेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या या टीझर मधून पहायला मिळते आहे.सर्वांच्या अंगावर शहारे आणणारा हा टीझर असून, औरंगजेबाचा कपटी अवतार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा “धैर्यशील बाणा “यात पहायला मिळतो आहे. ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत तर अभिनेते यतीन कार्येकर क्रुर मुघलशासक औरंगजेबाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवार ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.शिवचरित्रातील महत्त्वाचा अध्याय म्हणजे आग्रा भेट आणि औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून राजगडच्या दिशेने महाराजांनी केलेली कूच. १७ ऑगस्ट १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले. या संकटात महाराज किंचितही डगमगले नाहीत. रक्ताचा थेंबही न सांडता ते काही दिवसांनी आई जिजाऊंच्या चरणी सुखरूप राजगडावर पोचले. डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक राजाराम केंढे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रफुल्ल तावरे सहनिर्माते तर आहेत. रविंन्द्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे.या चित्रपटात यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य असे अनुभवी कलाकार अमोल कोल्हेंसोबत असणार आहेत. तसेच अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. छत्रपती शंभुराजेंच्या भूमिकेत हरक अमोल भारतीय हा बालकलाकार झळकणार आहे.

*”वारसा परिवार” शिवभक्त अकलूजकर यांचे आवाहन.*

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आतापुन्हा एकदा *‘शिवप्रताप गरुडझेप’* या चित्रपटामधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे…या चित्रपटामध्ये अमोलजी कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत,तर अभिनेते यतीन कार्येकर हे औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत.तर मनवा नाईक ही अभिनेत्री शिवाजी महाराज यांची पत्नी सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहे.तर अकलूज चे अजयजी तपकिरे हे बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत दिसणार आहेत… ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या प्रमोशन करिता “वारसा परिवार” शिवभक्त अकलूजकर यांना या चित्रपटातील बहिर्जी नाईक भूमिका साकारणारे अजयजी तपकिरे यांनी नुकतीच भेट दिली. व या चित्रपटातील प्रसंगा विषयी सविस्तर माहिती दिली.”वारसा परिवार” शिवभक्त अकलूजकर नक्कीच परिवारासोबत हा चित्रपट पाहणार आहेत ..”वारसा परिवार” शिवभक्त अकलूजकर यांनी आपल्या परिवारासोबत जवळच्या चित्रपटगृहात ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट पहावा.असे आवाहन केले आहे.या प्रमोशन प्रसंगी अभिनेता अजयजी तपकिरे,लेखक समीर माने,उमेश पावनगडकर, शिवाजी घोडके,रोहित सूर्यवंशी,राहुल माने , तेजस , सागर , हरिश्चंद्र काळे, अजिंक्य गाडे, हर्षवर्धन , आकाश , सुधीर , सागर , सागर देशमाने आदी उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
घुमान सायकल यात्रेसाठी सहकार्य करु : धैर्यशील मोहिते पाटील यांची ग्वाही

घुमान सायकल यात्रेसाठी सहकार्य करु : धैर्यशील मोहिते पाटील यांची ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In