माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका माळशिरस यांचे वतीने 23सप्टेंबर रोजी अकलूज येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका माळशिरस यांचे वतीने 23सप्टेंबर रोजी स्मृतिभवन, यशवंतनगर -अकलूज येथे सकाळी 10ते सायंकाळी 6वाजेपर्यंत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केल्याची माहिती माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान यांनी दिली.सदर शिबीर सोलापूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी (आय. ए. एस.)यांच्या अध्यक्षते खाली होणार असून, सोलापूर ग्रामीण चे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अकलूज चे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे,अकलूज नगरपरिषद चे मुख्याधि कारी दयानंद गोरे,अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सा. बां. विभाग अकलूज चे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.या शिबिरात द लॉयन अकॅडमी पुणे चे संचालक, तथा नायब तहसीलदार उत्तम पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी माळशिरस तालुक्यातील सर्वांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान यांचे वतीने करण्यात आले आहे.
सदर शिबिरात सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणी साठी 9595114444,9422068726,9270021688,7020122210. या नंबर वर संपर्क साधावा.







