माळीनगर येथे विविध संस्थाच्या सहायाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु निदान,दंत चिकीत्सा शिबिर संपन्न……………
..राविवार ता १८सप्टेंबर २२ रोजी माळीनगर येथे दि सासवड माळी शुगर फँक्टरी,शुगरकेन विकास सोसायटी, महात्मा फुले पतसंस्था,गिताई प्रतिष्ठान माळीनगर यांचे विद्य्यमाने सौभाग्य मंगल कार्यालय येथे कुल्लोळी नेत्रालय व फेको सेंटर सांगली यांचे संयुक्त सहकार्याने मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु निदान, दंत चिकित्सा व महिलांसाठी आरोग्य शिबीर सकाळी ९ते४ या वेळात डाँ.संतोष खडतरे,अध्यक्ष इंडीयन मेडी. असो,डाँ शिंदे, डाँ.स्वप्नील भोसले,दंतरोग तज्ञ,डाँ.म्रुणाल भोसले स्रीरोग तज्ञ,डाँ. विद्याताई एकतपुरे,अध्यक्ष गिताई प्रतिष्ठान,आदीचे उपस्थितीत व हस्ते करणेत आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. राजेंद्र गो. गिरमे ,मँनेजींग डायरेक्टर दि.सा.मा.शु. फँ. हे होते .याप्रसंगी मा. नंदकुमार गिरमे चेअरमन दि.सा.मा.शु.फँ., परेश दि. राऊत व्हा. चेअरमन,सतीश दि. गिरमे,होल टाईम डायरेक्टर, अँड.सच्चिदानंद बधे सेक्रेटरी दि.सा.मा.एज्यु. सोसायटी,महादेव एकतपुरे, व्हा.चेअरमन महात्मा फुले पतसंस्था व वरील समस्त संस्थांचे संचालक मंडळ व परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते या शिबिराचा सर्व मिळुन ३१०लाभार्थियांनी लाभ घेतला.त्यामधे मोठ्या प्रमाणात व्रुद्धांचा नेत्र तपासणीकडे कल होता पैकी सुमारे २५० लोकांचे मधुन ५०पेशंट मोतीबिंदुचे निघाले त्यांचेवर सांगली येथील नामंकीत कुल्लोळी नेत्रालय मधे अल्पशा खर्चात फेको शस्रक्रिया करण्यात येणार आहे. हे शिबिर यशस्वी करणेकामी स्थानिक संस्था प्रतिनिधी सह कुल्लोळी नेत्रालय हाँस्पिटलचे कार्यक्षम समन्वयक श्री.सुनिल पाटील,संतोष शेटे,अक्षय सदामते,श्रीमती अंकीता अंबोले ड्रायव्हर, विश्र्वनाथ पुणेकर,व माळीनगर येथील डाँ.म्हेत्रे यांचे व अन्य सहकार्याचे मोलाचे सहकार्य लाभले असे लोकोपयोगी मोफत शिबीर आयोजीत केले बद्दल उपस्थित लाभधारकांनी संयोजकाचे व कुल्लोळी हाँस्पिटल सांगली यांचे आभार मानले








