बार्शी (प्रतिनिधी )सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील 35वर्षीय तरुणाला मारुती कंपनी ची स्विफ्ट डिजायर गाडी खरेदी करण्यासाठी अमरावती येथील एजंट यांनी त्यास गाडी पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी अमरावती येथे बोलवून घेतले.तेथे एका महिला एजंट सह इतर एजंट हजर होते.सदर तरुणाने गाडी पसंत करून गाडीची किंमत म्हणून तीन लाख रुपये एजंट ला वेळोवेळी दिले.त्यानंतर काही दिवसांनी त्या तरुणाला सोलापूर शहर व चंद्रपूर पोलिसांनी फोन करून तुम्ही खरेदी केलेली गाडी चोरीची आहे. असे सांगितले.त्यामुळे आपली तीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी ने अमरावती शहर पोलीस ठाणे अंतर्गत घाडगे नगर पोलीस ठाणे येथे फिर्यादी ची फसवणूक केल्याप्रकरणी भादवि ४१९,४२०,४६८,४७१,३४अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास अमरावती पोलीस करीत आहेत.
दरम्यान कोणत्याही नागरिकांनी टू व्हीलर अथवा फोर व्हीलर गाडी खरेदी करताना गाडीची कागदपत्रे, तसेच ती गाडी चोरीची तर नाही ना, याची खातरजमा करून व्यवहार करावा. तसेच आपली फसवणूक होऊ नये, म्हणून गाडी स्थानिक पातळी वर आपल्या परिसरातील ओळखीच्या व्यक्तीकडून घ्यावी.असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







