विष्णूभाऊ कसबे यांच्या हस्ते ओंकार कलेक्शन कापड दुकानाचा आप्पासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ
माळशिरस(प्रतिनिधी ) – येथील पेट्रोलपंपा लगत नव्याने उभारलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपकाळ यांच्या ओंकार कलेक्शन कापड दुकानाचा शुभारंभ काल दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वा. लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख होते. यावेळी सपकाळ कुटुंबातील सर्व सदस्य,कैलास वामन नगरसेवक,नंदुभाऊ लांडगे नगरसेवक,तानाजी (नाना) शिंदे,रिपाइं जिल्हा नेते रमेश धाईंजे,आधुनिक लहुजी सेना जिल्हाध्यक्ष महादेव भाऊ तुपसौंदर दलित महासंघाचे सचिन रणदिवे याचेंसह तालुक्यातील आजी माजी नगरसेवक,सरपंच, उपसरपंच,सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य प्रतिष्ठित मान्यवर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी पत्रकार बांधव सह गावकरी मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










